EcoTour 

    चला कच्छला,
    जीवाश्मांसोबत पृथ्वीचा इतिहास उलगडायला !

    (कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या अद्भुत विश्वात नेणारी इकोटूर)


    About EcoTour :  

    विशेष आकर्षण:

    • कोट्यवधी वर्षांपूर्वीची जीवाश्म पाहणे, गोळा करणे
    • हिमालय-सह्याद्रीच्या आधीची जीवसृष्टी समजून घेणे
    • 20 ते 125 दशलक्ष वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार बनणे
    • खडकांमध्ये / जीवाश्मांमध्ये दडलेली रहस्ये उलगडणे
    • पूर्वीचा समुद्र मागे का हटला ते समजून घेणे
    • जगप्रसिद्ध ‘कच्छचे रण’ पाहणे, अनुभवणे
    • लखपत येथील प्राचीन किल्ला, बंदराला भेट

     

    कालावधी:

    बॅच 2:

    (8 ते 14 जानेवारी 2024

     

    एकूण जागा: 17

     

    शुल्क:

    रु. 21,500 (मुंबई ते मुंबई; सर्वसमावेशक)

    (ट्रेन प्रवास 3AC, मुक्काम, चहा-नाश्ता-जेवण, स्थानिक प्रवास, मार्गदर्शन)

     

    संपर्क:

    9545350862 / 9922063621

     

    ** ट्रेनचे बुकिंग अडीच-तीन महिने आधी करावे लागणार असल्याने लवकर निर्णय घ्यावा.


    View Itinerary


    Contact Details:  
      9545350862
      [email protected]

       Register


    भवताल इकोटूर

     

    कच्छ जीवाश्म इकोटूर (Batch 2)

    (8 जानेवारी – 14 जानेवारी 2024)

     

    नियम व प्रवेश रद्द करण्याचे धोरण:

     

    ‘भवताल’तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या इको-टूरच्या माध्यमातून सहभागींना निसर्ग, परिसर, पाणी, जैवविविधता, भूविज्ञान, वारसा अशा विषयांची सखोल माहिती व अनुभव दिला जातो. त्याअंतर्गत काही गोष्टींची काळजी घेतली तर हा अनुभव अधिक संपन्न करणारा असेल आणि निसर्गातील घटकांना हानी पोहोचवता त्यांचे संवर्धन करणारा ठरेल. इको-टूर दरम्यान पुढील गोष्टींची काळजी घ्यावी आणि नियम पाळावेत=

     

    सर्व सहभागींनी ‘भवताल इकोटूर’ दरम्यान,

     

    पूर्वकाळजी :

    १)   आपापले ओळखपत्र सोबत बाळगावे आणि आयोजकांच्या विनंतीनुसार ते दाखवावे.

    २)   वैयक्तिक औषधे, पाण्याची बाटली, बॅटरी तसेच, त्या त्या हंगामानुसार उन्हासाठी टोपी, उबदार कपडे, छत्री-रेनकोट, आदी आवश्यक गोष्टी सोबत बाळगाव्यात.

    ३)   प्रकृतीच्या गंभीर तक्रारी, अॅलर्जी किंवा तशा तक्रारी असल्यास त्याबाबत ‘भवताल’ टीमला पूर्वकल्पना द्यावी.

     

    सहकार्य व शिस्त :

    ४)   आपला प्रवास, ठिकाणांच्या भेटी व मुक्काम यादरम्यान सोबत असलेल्या ‘भवताल’ प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करावे.

    ५)   इको-टूर मध्ये विविध कारणांमुळे नियोजनात काही बदल संभवतात. अशा वेळी ‘भवताल’ प्रतिनिधींना पूर्ण सहकार्य करावे. नियोजनात / कार्यक्रमात अडथळे येतील असे वर्तन करू नये.

    ६)   आपला प्रवास, ठिकाणांच्या भेटी यादरम्यान मद्यपान व मादक पदार्थांना परवानगी दिली जात नाही. आपल्याकडून त्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी.

    ७)   प्रवास, मुक्काम, ठिकाणांना भेटी या दरम्यान सहभागींनी एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. याबाबत मतभेद उद्भवल्यास आयोजक निर्णय घेतील. तो सर्वांना बंधनकारक असेल.

    ८)   शिस्त किंवा नियमांचा भंग करणाऱ्या सहभागींना टूरमध्ये कायम ठेवायचे की नाही याचे तसेच, शिस्तभंगासंबंधी योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार आयोजकांकडे असतील. अशा परिस्थितीत टूर पूर्ण करता आली नाही तरी अशा सहभागींना कोणताही परतावा मिळणार नाही.

     

    निसर्गाची काळजी :

    ९)   सहभागींनी दरम्यान शक्यतो बाहेरील बाटलीबंद पाणी विकत घेवू नये. अगदीच आवश्यकता भासल्यास पाणी घेतले, तर रिकामी बाटली निसर्गात टाकू नये. सोबत बाळगावी आणि ती योग्य ठिकाणी जमा करावी. या संदर्भात हवे असल्यास आयोजक मार्गदर्शन करतील.

    १०) जास्त कचरा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच, निर्माण झालेला कचरा, कोणत्याही वस्तू, आवरणे, कागद-प्लास्टिक निर्सगात टाकू नये. हे सर्व सोबत बाळगावे आणि योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाईल याची काळजी घ्यावी. या संदर्भात हवे असल्यास आयोजक मार्गदर्शन करतील.

    ११)नैसगिक गोष्टींना, इतर सजीवांना अपाय होईल, इजा होईल अशी कोणतीही कृती करू नये.

     

    निसर्गाचा आनंद :

    १२)इको-टूरमध्ये आपण बहुतांश वेळ निर्सगाच्या सानिध्यात असतो. त्या त्या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडून मिळणारी माहिती शांतपणे ऐकावी, समजून घ्यावी, प्रश्न योग्य पद्धतीने विचारावे.

    १३)भवताल इकोटूर दरम्यान निसर्ग, पर्यावरण व अवतीभवतीच्या घटकांचा अनुभव उघड डोळ्यांनी व संवेदनशीलपणे घ्यावा. हा आस्वाद आपण घेत असतानाच त्यामुळे इतरांना व निसर्गाला हानी पोहोचणार नाही, याचीही काळजी घ्यावी

    इतर :

    १४)भवताल इकोटूर साठी प्रवासाची व्यवस्था ही त्या त्या टूरनुसार ‘भवताल’तर्फे किंवा सहभागींकडून वैयक्तिक असू शकते. त्या संदर्भात टूरनुसार सूचित केले जाईल.

     

    *** भवताल इको-टूर संबंधी अटी आणि नियमांमध्ये परिस्थितीनुसार / वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार ‘भवताल’कडे राहतील.

     

    प्रवेश रद्द करण्याचे धोरण:

     

    ·‘इको-टूर’ किंवा ‘इको-कॅम्प’ मध्ये एखाद्या व्यक्तीला / गटाला प्रवेश नाकारण्याचा अधिकार किंवा घेतलेला प्रवेश रद्द करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील. अर्थात, काही संयुक्तिक कारण असेल तरच असे पाऊल उचलले जाईल.

    ·‘इको-टूर’ किंवा ‘इको-कॅम्प’ मध्ये आपण नाव नोंदवल्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव सहभागी होता येणार नसेल तर पुढील गोष्टी पूर्ण कराव्यात=

    १)‘भवताल टीम’ला अधिकृत ईमेलवर ([email protected]) किंवा अधिकृत क्रमांकावर (9545350862) किंवा संबंधित टूरसाठी कळवण्यात आलेल्या संपर्क क्रमांक किंवा ई-मेलवर स्पष्टपणे व लेखी स्वरूपात कळवावे.

    २)आपली लेखी सूचना भवताल टीमपर्यंत पोहोचली आहे याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून नियोजनात व्यत्यय येणार नाही, आयोजकांची व इतर सहभागींची गैरसोय होणार नाही. तसेच, व्यवस्थांवर ताणही पडणार नाही.

     

    शुक्लातील वजावट :

    कच्छ जीवाश्म इकोटूर: 8 ते 14 जानेवारी 2024’ या इकोटूरला प्रवेश घेतल्यानंतर तो रद्द केल्यास टूरसाठी भरलेल्या पूर्ण शुल्कातून पुढील प्रमाणे रक्कम वजा केली जाईल. आपली लेखी सूचना ‘भवताल टीम’ला उपलब्ध झाल्यानंतर शुल्कातून पुढीलप्रमाणे रक्कम वजा केली जाईल:

     

    20 ऑक्टोबर 2023 पर्यंत:

    शुल्कातील 25 टक्के रक्कम (रु. 5375) वजा केली जाईल.

     

    21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023:

    शुल्कातील 40 टक्के रक्कम (रु. 8600) वजा केली जाईल.

     

    6 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2023:    

    शुल्कातील 50 टक्के रक्कम (रु. 10,750) वजा केली जाईल.

     

    31 डिसेंबर 2023 ते 7 जानेवारी 2024:

    शुल्कातील 60 टक्के रक्कम (रु. 12,900) वजा केली जाईल.

     

    सूचना :

    ·या धोरणात टूर / कॅम्प यांच्या स्वरूपानुसार काही बदल होऊ शकतात.

    ·केंद्र, राज्य, जिल्हा, स्थानिक किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाने महामारीमुळे किंवा कोणत्याही अचानक उद्भवलेले लॉकडाऊन / निर्बंध / अलगीकरणाची स्थिती / आपत्कालिन परिस्थिती / अपवादात्मक / उल्लेख न केलेल्या परिस्थितीत किती परतावा द्यावा, याबाबतचे अधिकार आयोजकांकडे असेल.

     

    अधिक माहितीसाठी:

    9545350862

    [email protected]