EcoTour 
    बेस्ट ऑफ महाराष्ट्र

    आपल्याच भूमिची नव्याने ओळख करून घेण्यासाठी


    About EcoTour :  

    महाराष्ट्राची भूमी आगळीवेगळी आहे. इथला भूगोल, डोंगर-दऱ्या-पठारं, इथला निसर्ग-जैवविविधता, इतिहास आणि संस्कृती हे सारंच अतिशय विलक्षण आहे. पण या वैशिष्ट्यांपैकी काही सोडली तर इतरांकडे तितक्या सखोलपणे पाहिले जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नेमके काय दडले आहे हे लक्षातच येत नाही. मग महाराष्ट्राची खरी-खुरी ओळख कशी पटेल?
    त्यासाठीच भवताल इकोटूर्स तर्फे बेस्ट ऑफ महाराष्ट्र हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याचा पहिला हंगाम (सीझन १) ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ असा असेल. त्यात मुख्यत: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागातील वैशिष्ट्यांचा समावेश असेल. दर महिन्याच्या एका वीकेंडला (शनिवार - रविवार) दोन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहायच्या, समजून घ्यायच्या आणि अनुभवायच्या, अर्थातच त्या विषयातील तज्ज्ञांसोबत! महाराष्ट्राचे खरे दर्शन घडवण्याचा हा उपक्रम. त्यातून नव्या गोष्टी माहीत होतील. काही गोष्टी माहीत असतील तर नव्या ज्ञानाची, दृष्टिकोनाची भर पडेल.

    वेळापत्रक - सीझन १
    1)ऑगस्ट वीकेंड मान्सून, पाऊस आणि धरण (पश्चिम घाट)
    2)सप्टेंबर वीकेंड बहरणारी पठारे आणि देवराई (पश्चिम घाट)
    3)ऑक्टोबर वीकेंड

    जिजाऊंनी बांधून घेतलेले धरण,

    बारा मोटेची विहीर

    (पुणे-सातारा)
    4)नोव्हेंबर वीकेंड लाव्हा टनेल आणि सांदण व्हॅली (भंडारदरा - अकोले परिसर)
    5)डिसेंबर वीकेंड गरम पाण्याचे झरे आणि कातळशिल्प (रत्नागिरी जिल्हा)
    6)जानेवारी वीकेंड प्राचीन व्यापारी मार्गाची झलक (नाणेघाट-जुन्नर किंवा बेडसे-भाजे परिसर)
    7)फेब्रुवारी वीकेंड प्राचीन मंदिरे शैली व वारसा (कोपेश्वर- खिद्रापूर किंवा गोंदेश्वर- सिन्नर)

    *बेस्ट ऑफ महाराष्ट्र चे वेळापत्रक निश्चित आहे. मात्र, परिस्थितीनुसार थीम, तारखा व ठिकाणांमध्ये काही बदल संभवतात.

     

    • शुल्क:   रु. २२,५००

    (या शुल्कात कोणत्याही पाच टूरमध्ये सहभागी होता येईल. उर्वरीत दोन टूर्समध्ये सवलतीच्या दरात सहभागी होता येईल.)

    • रु. ५००० इतके नोंदणी शुल्क भरून आपले नाव नोंदवा, उर्वरीत रक्कम १५ जुलैपर्यंत भरू शकता.

    (मर्यादित जागा.)

     

    • बेस्ट ऑफ महाराष्ट्र मधील सर्व टूर्स पुणे ते पुणे अशा असतील.
    • त्या वीकेंडला शनिवारी सकाळी सुरू होतील आणि रविवारी सायंकाळी पूर्ण होतील.
    • प्रवास नॉन-एसी मिनी बसने असेल.
    • राहण्याची व्यवस्था शक्यतो होम-स्टे, टेन्ट, रेस्ट हाऊस, हॉटेल्स अशी त्या-त्या ठिकाणच्या सोयी व उपलब्धतेनुसार असेल.
    • टूरच्या शुल्कामध्ये मार्गदर्शन, प्रवास, मुक्काम, २ वेळचा नाश्ता, ३ वेळचे जेवण, २ वेळचा चहा अशा सर्व मूलभूत सेवा-सुविधांचा समावेश असेल.


    Contact Details:  

    Fees Structure

    Fee Type Price Currency
    कोणत्याही पाच टूर साठी 22500 INR Click here to register
    नावनोंदणी साठी बुकिंग ची रक्कम 5000 INR Click here to register