EcoTour 
    चलो हिमालय !

    About EcoTour :  

    ट्रेकिंग, अॅडव्हेंचेर आणि बर्फाच्छादित शिखरे...
    12+ मुलांसाठी स्पेशल समर कॅम्प

    विशेष आकर्षण:

    • बर्फातील ट्रेकिंग आणि हिमनद्या
      @हामता खिंड
    • बर्फाच्या कुशीतील पर्वतरांगा
      @रोहतांग खिंड
    • उंचीवरील सर्वांधिक लांबीचा बोगदा
      @अटल टनेल
    • हिमालयातील सर्वांगसुंदर ठिकाण
      @जिस्पा गाव
    • गरम पाण्याची कुंडं / प्राचीन मंदिरे
      @मनाली
    • राफ्टिंग / पॅराग्लायडिंग/ अॅडव्हेंचर
      @कुलू

    कालावधी: 17 - 25 एप्रिल 2024
    शुल्क: रु. 46,000 (पुणे ते पुणे)

    • इकोटूर चे संपूर्ण शुल्क (रु. 46,000) भरून किंवा नोंदणी शुल्क (रु. 18,000) भरून नोंदणी करता येईल.
    (विमान तिकिटात वाढ संभवत असल्याने 15 मार्च 2024 नंतर शुल्क वाढू शकते.)


    समावेश,

    • विमान प्रवास (पुणे-दिल्ली-पुणे)
    • व्होल्वो बस प्रवास (दिल्ली-मनाली-दिल्ली)
    • नाश्ता-जेवण, डिलक्स स्टे
    • पर्यटन ठिकाणांना भेटी
    • तज्ज्ञ मार्गदर्शक

    मार्गदर्शक,
    नॅचरॅलिस्ट श्री. अभिजित घोरपडे
    पर्यावरणतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड

    Trek & Adventure in the Snow - Mountains
    Special Summer camp for 12+ children

    Special attractions:

    • Trek in the snow & glaciers
      @Hampta pass
    • Amid beautiful snow mountains
      @Rohtang pass
    • World’s longest tunnel at height
      @Atal Tunnel
    • Beautiful village in Himalayas
      @Jispa village
    • Hot water spring / Old Temples
      @Manali
    • Rafting / Paragliding / Adventure
      @Kulu

    Dates: 17 - 25 April 2024

    Fees: Rs. 46,000 (Pune to Pune)
    (Rates may vary after 15 March 2024 due to hike in the airfare)
    Includes,

    • Air travel (Pune-Delhi)
    • Volve bus (Delhi-Manali)
    • Food & Deluxe stay
    • Sight-seeing
    • Expert guidance

    Accompanied by,
    Naturalist Mr. Abhijit Ghorpade
    Environmentalist Dr. Mahesh Gaikwad



    Contact Details:  
      9545350862
      [email protected]

       Register


    नियम व प्रवेश रद्द करण्याचे धोरण:

    भवताल तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या इको-टूरच्या माध्यमातून सहभागींना निसर्ग, परिसर, पाणी, जैवविविधता, भूविज्ञान, वारसा अशा विषयांची माहिती व अनुभव देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याअंतर्गत काही गोष्टींची काळजी घेतली तर हा अनुभव अधिक संपन्न करणारा असेल आणि निसर्गातील घटकांना हानी न पोहोचवता त्यांचे संवर्धन करणारा ठरेल. इकोटूर दरम्यान पुढील गोष्टींची काळजी घ्यावी आणि नियम पाळावेत

     सर्व सहभागींनी भवताल इकोटूर दरम्यान,

     पूर्वकाळजी :
    १)आपापले वैध फोटो-ओळखपत्र (आधार / ड्रायव्हिंग लायसेन्स / व्होटर आयडी) सोबत बाळगावे आणि आयोजकांच्या विनंतीनुसार ते दाखवावे.
    २)वैयक्तिक औषधे, पाण्याची बाटली, बॅटरी तसेच, त्या त्या हंगामानुसार उन्हासाठी टोपी, उबदार कपडे, छत्री-रेनकोट, पायात योग्य ते शूज, आदी आवश्यक गोष्टी सोबत बाळगाव्यात.
    ३)प्रकृतीच्या गंभीर तक्रारी, अॅलर्जी किंवा तशा तक्रारी असल्यास त्याबाबत भवताल टीमला पूर्वकल्पना द्यावी.


    सहकार्य व शिस्त :
    ४)आपला प्रवास, ठिकाणांच्या भेटी व मुक्काम यादरम्यान सोबत असलेल्या भवताल प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करावे.
    ५)इको-टूर मध्ये विविध कारणांमुळे नियोजनात काही बदल संभवतात. अशा वेळी भवताल प्रतिनिधींना पूर्ण सहकार्य करावे. नियोजनात / कार्यक्रमात अडथळे येतील असे वर्तन करू नये.
    ६)प्रवास, मुक्काम, ठिकाणांना भेटी या दरम्यान सहभागींनी एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. याबाबत मतभेद किंवा काही वाद उद्भवल्यास आयोजक निर्णय घेतील. तो सर्वांना बंधनकारक असेल.
    ७)शिस्त किंवा नियमांचा भंग करणाऱ्या सहभागींना टूरमध्ये कायम ठेवायचे की नाही याचे तसेच, शिस्तभंगासंबंधी योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार आयोजकांकडे असतील. अशा परिस्थितीत टूर पूर्ण करता आली नाही तरी अशा सहभागींना कोणताही परतावा मिळणार नाही.
     

    निसर्गाची काळजी :
    ८) जास्त कचरा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच, निर्माण झालेला कचरा, कोणत्याही वस्तू, आवरणे, कागद-प्लास्टिक निर्सगात टाकू नये. हे सर्व सोबत बाळगावे आणि योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाईल याची काळजी घ्यावी. या संदर्भात हवे असल्यास आयोजक मार्गदर्शन करतील.
    ९)नैसगिक गोष्टींना, इतर सजीवांना अपाय होईल, इजा होईल अशी कोणतीही कृती करू नये.

     

    निसर्गाचा आनंद :
    १०)इको-टूरमध्ये आपण बहुतांश वेळ निर्सगाच्या सानिध्यात असतो. त्या त्या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडून मिळणारी माहिती शांतपणे ऐकावी, समजून घ्यावी, प्रश्न योग्य पद्धतीने विचारावे.
    ११)भवताल इकोटूर दरम्यान निसर्ग, पर्यावरण व अवतीभवतीच्या घटकांचा अनुभव उघड डोळ्यांनी व संवेदनशीलपणे घ्यावा. हा आस्वाद आपण घेत असतानाच त्यामुळे इतरांना व निसर्गाला हानी पोहोचणार नाही, याचीही काळजी घ्यावी.

     

    इतर :
    १२) भवताल इकोटूर साठी प्रवासाची व्यवस्था ही त्या त्या टूरनुसार भवताल तर्फे किंवा सहभागींकडून वैयक्तिक असू शकते. त्या संदर्भात टूरनुसार सूचित केले जाईल.
     *** भवताल इको-टूर संबंधी अटी आणि नियमांमध्ये परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार भवताल कडे राहतील.


    प्रवेश रद्द करण्याचे धोरण:

    • इको-टूर किंवा इको-कॅम्प मध्ये एखाद्या व्यक्तीला / गटाला प्रवेश नाकारण्याचा अधिकार किंवा घेतलेला प्रवेश रद्द करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील. अर्थात, काही संयुक्तिक कारण असेल तरच असे पाऊल उचलले जाईल.
    • इको-टूर किंवा इको-कॅम्प मध्ये आपण नाव नोंदवल्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव सहभागी होता येणार नसेल तर पुढील गोष्टी पूर्ण कराव्यात

    १) भवताल टीमला अधिकृत ईमेलवर ([email protected]) किंवा अधिकृत क्रमांकावर (9545350862) किंवा संबंधित टूरसाठी कळवण्यात आलेल्या संपर्क क्रमांक किंवा ई-मेलवर स्पष्टपणे व लेखी स्वरूपात कळवावे.
    २)आपली लेखी सूचना भवताल टीमपर्यंत पोहोचली आहे याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून नियोजनात व्यत्यय येणार नाही. 


    शुल्क भरण्याचे टप्पे व शुल्कातील वजावट:

    चलो हिमालय... इकोटूर: (१७ ते २५ एप्रिल २०२४)

     

    शुल्कातील वजावट:
    •नोंदणी शुल्क भरून आपण टूरमधील सहभाग निश्चित करू शकता. हे शुल्क non-refundable आहे. त्याचा परतावा मिळणार नाही.

    •नोंदणी रद्द केल्यास टूरसाठी भरलेल्या शुल्कातून पुढील प्रमाणे रक्कम वजा केली जाईल. आपली लेखी सूचना भवताल टीमला उपलब्ध झाल्यानंतर शुल्कातून पुढीलप्रमाणे रक्कम वजा केली जाईल:

     

    ८ एप्रिल पर्यंत प्रवेश रद्द केल्यास:
    वजा केली जाणारी रक्कम= रु. १८,००० (नोंदणी शुल्क)

     

    ९ एप्रिल ते १६ एप्रिल २०२४ दरम्यान प्रवेश रद्द केल्यास:
    वजा केली जाणारी रक्कम =रु. २५,०००

     

    १६ एप्रिल २०२४ नंतर प्रवेश रद्द केल्यास:
    कोणताही परतावा मिळणार नाही.

     

    सूचना :

    • केंद्र, राज्य, जिल्हा, स्थानिक किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाने महामारीमुळे किंवा कोणत्याही अचानक उद्भवलेले लॉकडाऊन / निर्बंध / अलगीकरणाची स्थिती / आपत्कालिन परिस्थिती / अपवादात्मक / उल्लेख न केलेल्या परिस्थितीत किती परतावा द्यावा, याबाबतचे अधिकार आयोजकांकडे असेल.
    • इकोटूर दरम्यान काही कारणांमुळे कार्यक्रम-पत्रिकेतील काही ठिकाणे किंवा उपक्रम वगळले जाण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शुल्कातील रक्कम कमी केली जाणार नाही.
    • विमान तिकिटे किंवा हॉटेल बुकिंगबाबत ऐनवेळी काही अडथळे आल्यास इकोटूरचे नियोजन अर्ध्या ते एक दिवसाने मागे-पुढे होऊ शकते.
    • काही परिस्थितीत प्रवास सुरू करण्याचे किंवा प्रवास संपण्याचे ठिकाण बदलू शकते. त्याबाबत सहभागींना आधी सूचित केले जाईल.
    • हवामान, काही नैसर्गिक आपत्ती किंवा तत्सम अपवादा‍त्मक परिस्थितीमुळे मुक्काम वाढवावा लागला तर त्या परिस्थितीत जास्तीची रक्कम सहभागींना भरावी लागेल.

      
    शुल्क भरण्यासाठी तपशील:

    Bank Details

    • AC Name-BHAVATAL
    • AC No-922020030670647
    • IFSC-UTIB0000104
    • AC Type-Current
    • Axis Bank Kothrud,Pune

     

    (रक्कम ट्रान्सफर केल्यावर आपले नाव व स्क्रीन शॉट पुढील क्रमांक / ई-मेलवर शेअर करावा.)

    भवताल टीम
    9545350862 / [email protected]