EcoTour 
    वंडर्स ऑफ जिऑलॉजी

    About EcoTour :  

    अनोख्या महाराष्ट्राच्या दर्शनाने
    सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी...

    वंडर्स ऑफ जिऑलॉजी !
    - अद्भुत महाराष्ट्र एक्सप्लोर करणारी फिल्ड टूर

    ‘दगडांच्या देशा’ अशी ओळख असलेला महाराष्ट्र.
    ६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या खडकाने या राज्याला घडवले.
    इथे त्याची असंख्य अद्भुत भूरूपे दडली आहेत.
    त्यांच्यात कोट्यवधी वर्षांचा इतिहास दडला आहे.
    त्यांचा शोध घेणारी आणि त्यांची रहस्यं उलगडणारी,
    ही तीन दिवसांची अफलातून टूर...

    कालावधी:
    शुक्रवार - शनिवार - रविवार; 
    २९ ते ३१ डिसेंबर २०२३
    (सहभागी संख्या २५)
     
    विशेष आकर्षण:
    · ६.५० कोटी वर्षे जुना खडक, त्यातील पुराव्यांची ओळख
    · लाव्हारसामुळे तयार झालेल्या नैसर्गिक बोगद्यात प्रवेश
    · सत्तर हजार वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या राखेचा शोध
    · आशियातील सर्वांत मोठ्या रांजणखळग्यांचा अनुभव
    · हवामानबदलाची प्राचीन कहाणी सांगणाऱ्या दगडाचा शोध
    · नदीकाठी आदिमानवाच्या दगडी हत्यारांच्या खाणाखुणा
    · आणि खडकात दडलेल्या बऱ्याच रहस्यमय गोष्टी... 

    माहिती व नावनोंदणीसाठी :
    https://bhavatal.com/Ecotours/Geology3

    शुल्क:
    रु. ७८०० (पुणे ते पुणे)
    संपूर्ण प्रवास, दोन मुक्काम, मार्गदर्शन, जेवण-चहा-नाश्ता यांसह सर्व समावेशक



    Contact Details:  
      9545350862
      [email protected]