Articles 
एका वनस्पतीचा १४४ वर्षांनी कसा पुनर्शोध लागला त्याची गोष्ट !

एका वनस्पतीचा १४४ वर्षांनी कसा पुनर्शोध लागला त्याची गोष्ट !

एका वनस्पतीचा १४४ वर्षांनंतर

कसा पुनर्शोध लागला त्याची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ४१)

नाशिककडून प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वरकडे जाताना डाव्या बाजूला आपोआपच लक्ष जाते. हाताच्या अंगठ्यासारखा दिसणारा अंजनेरी गडाचा मोठा सुळका डोकावतो. त्याच्या पाठीमागे दिसणारा विस्तीर्ण अजस्त्र कातळदेखील डोळ्यात भरतो.

अंजनेरी गडावरील जैवविविधता

हनुमानाचे जन्मस्थान म्हणून भाविकांच्या वहिवाटीचा असलेला हा गड अधिवासांच्या विविधतेमुळेही निसर्ग संपदेने समृद्ध आहे.  येथील वनस्पतींचा समग्र अभ्यास व नोंद करण्यासाठी तसेच, त्याचे महत्त्व  सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे याकरता आम्ही गेली अनेक वर्षे अंजनेरीवर नियमित जात आहोत. २०१४ पासून याच विषयावर एक शॉर्ट फिल्म बनवणे सुरू झाले. त्यासाठी तेथील एकूण ४०० पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातींचा अभ्यास केला. त्यामधील १२५ वनस्पती प्रदेशनिष्ठ म्हणजे त्याच भागात आढळणाऱ्या आहेत असे लक्षात आले. अंजनेरीची जैवविविधता महत्त्वपूर्ण आहे. २००६ मध्ये 'सेरोपेजिया अंजनेरिका' (Ceropegia anjanerica) या वैशिष्ट्यपूर्ण प्रजातीची नोंद याच ठिकाणी सर्वप्रथम केली गेली. ही वनस्पती कंदिलफूल म्हणूनही ओळखली जाते. त्यात प्रसिद्ध वनस्पतीवैज्ञानिक प्रा. एस. आर. यादव आणि त्यांचे विद्यार्थी डॉ. नीलेश मालपुरे, डॉ. मयूर कांबळे यांनी केली.

अंजनेरीच्या पठारावर पाऊसकाळात (साधारण जून ते सप्टेंबर) येणाऱ्या वनस्पतींची विविधता खूपच मोठ्या प्रमाणावर असते. याच काळात पर्यावरण प्रेमी / वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक अंजनेरीला आवर्जून भेट देतात. ऑक्टोबर नंतर मात्र पठाराचे स्वरूप संपूर्णपणे बदलत जाते आणि तेथील वनस्पतींची विविधताही कमी होत जाते आणि कालांतराने संपूर्ण पठार ओसाड जमिनीसारखे भासू लागते. एखाद्या ठिकाणच्या वनस्पतींचा अभ्यास करावयाचा असल्यास वर्षातल्या सगळ्याच ऋतूत तेथे जाऊन अभ्यास करणे गरजेचे असते.

अडुळशाच्या कुळातील वाघाटी

अंजनेरीच्या वनस्पतींचे डॉक्युमेंटेशन करण्याकरता आमचेदेखील असेच वारंवार अंजनेरीवर जाणे होते. ३० डिसेंबर २०१७ च्या सकाळी मी आणि माझे सहकारी मित्र डॉ. शरद कांबळे गडावर जाण्याकरता निघालो. आम्ही पठाराची समुद्रसपाटीपासून ९५० - १००० मीटर उंचीवर असलेली, पश्चिमेकडील दाट झाडीतली आडवाट निवडली होती. डिसेंबर महिना असल्यामुळे आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात वाळलेल्या वनस्पती दिसत होत्या. जंगलाच्या पश्चिमेच्या बाजूला जात असताना काही वनस्पतींना गुलाबी निळसर रंगाची फुले आलेली दिसली. थोडं पुढे जाऊन वनस्पतीचे निरीक्षण केल्यानंतर ही वनस्पती  Acanthaceae (अडुळसा) या वनस्पतींच्या कुळातील( family) असून Dicliptera   गणातील (genus) हे लगेचच समजले. स्थानिक भाषेत तिला वाघाटी असे संबोधतात. त्या वनस्पतीचे नमुने पुढील अभ्यासासाठी बरोबर घेतले. नुकत्याच पाहिलेल्या वनस्पतीची प्रजाती शोधण्याची उत्सुकता मनाला लागली. त्यासाठी अनेक संदर्भ तपासले. अभ्यासाअंती ही वनस्पती Dicliptera leonotis असल्याचे लक्षात आल्यावर १४ जानेवारी २०१८ ला आम्ही म्हणजे मी, शरद कांबळे आणि विनोद गोसावी मिळून पुन्हा अंजनेरीवर त्या ठिकाणी पोहोचलो. वनस्पतींचे निरीक्षण करून आणखी काही नमुने आणि फोटो घेतले.

१४४ वर्षांपूर्वीची नोंद लंडनमधील संग्रह

अभ्यास करतांना आणखी खोलात शिरल्यावर अनेक नवीन गोष्टींची माहिती समोर येऊ लागली.  या Dicliptera leonotis ची नोंद “Flora of Nashik”  आणि  “ Flora of Maharashtra” या पुस्तकांमध्ये आहे. निकोलस अलेक्झांडर डालझेल नावाच्या स्कॉटिश वनस्पती अभ्यासकाने १४४ वर्षांपूर्वी, १८७४ साली या वनस्पतीची प्रथम नोंद केली. त्याने तिला Dicliptera leonotis असे नावही दिले. पण त्यानंतर त्या वनस्पतीची माहिती जगासमोर आली नाही. त्यानंतर क्लार्क या वनस्पती अभ्यासकाने डालझेल यांच्या नोंदी आणि नमुने अभ्यासून या वनस्पतीची माहिती जगासमोर आणली. त्यानंतर ज्यावेळी या वनस्पतीचा संदर्भ आला  त्यावेळी या पूर्वीच्या अभ्यासाचाच आधार घेतला गेला. पुन्हा प्रत्यक्ष वनस्पती पाहिल्याचा, अभ्यासल्याचा उल्लेख कुठेही आढळला नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे लंडनच्या 'क्यू बोटॅनिकल गार्डन हर्बेरियम, संकेतस्थळावर असलेल्या या नस्पतीचे हर्बेरियम म्हणजे वनस्पतीच्या नमुन्याचे छायाचित्रावरची माहिती वाचतांना असे लक्षात आले की, डालझेल यांनी  Dicliptera leonotis  ची नोंद,अंजनेरी या ठिकाणी येऊनच १८७४ मध्ये केलीली आहे. कारण त्या हर्बेरियम शीटवर वनस्पतीच्या माहिती बरोबर नाशिक जवळील अजनेरा हिल, नासिक असा ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख आढळतो.

फक्त अंजनेरीच

त्यानंतर आणखी शोध घेताना या प्रजातीची नोंद गुजरात मध्येही झाल्याचे लक्षात आले,  पण सर्व माहितीची पडताळणी केल्यानंतर गुजरात मधील प्रजाती ही burmanni असल्याचे लक्षात आले. तसेच, आफ्रिकेतील “Flora of Queensland” मध्ये नोंद केलेली वनस्पती देखील Dicliptera leonotis नसून Dicliptera cilata आहे ही हेही नक्की केले गेले.  म्हणजेच ही उत्तर पश्चिम घाटातच मिळणारी म्हणजे इथली प्रदेशनिष्ठ वनस्पती आहे. डालझेल यांनी या वनस्पतीची नोंद केल्यानंतर जगातील इतर कोणत्याही ठिकाणावर तिची नोंद झालेली नाही. अगदी अंजनेरी येथूनही पुन्हा नंतर ही वनस्पती दिसण्याचा, तिचा अभ्यास केल्याचा किंवा नमुने घेतल्याचा उल्लेख इतर कोणत्याही अभ्यासकाने आजवर केलेला नाही. म्हणजेच डालझेल यांच्या नोंदीनंतर इतक्या वर्षांनी म्हणजे जवळजवळ १४४ वर्षांनी पुन्हा ही वनस्पती दिसल्याची नोंद, नमुने आणि अभ्यास आम्ही केला. याचे आश्चर्य, आनंद आणि निसर्गातील अद्भुततेचे खूप अप्रुपदेखील आम्हाला वाटले.

निसर्गात विविधता आणि सौंदर्य अपरंपार आहे. शिवाय काहीही विनाकारण आहे असे नाही. प्रत्येक सजीव आणि निर्जिव अस्तित्वाचेही काहीतरी महत्त्व आहे, कारण आहे. त्याचा शोध घेणे आणि जीवसाखळीतील त्याचे महत्त्व ओळखणे याचा अभ्यास करणे खूप आव्हानात्मक आणि समाधानाचे आहे.

या गुपितांचा शोध बाकी

या वनस्पतीची संपूर्ण शास्त्रीय माहिती शोध निबंधाद्वारे, शोधपत्रिकेमध्ये  (Rheedea) आम्ही प्रकाशित केली. निसर्गात कोणत्याही भागाचा अभ्यास आता संपूर्ण झाला असे आपण कधीही म्हणू शकत नाही, हेच या उदाहरणावरून लक्षात येते. अजूनही अनेक अर्थांनी निसर्गाचा हा खजिना अभ्यासकांसाठी अस्पर्शीत आहे. या वनस्पतीचे संपूर्ण परिसंस्थेत (इकोसिस्टीम) नेमके काय महत्त्व आहे, तिच्यातल्या रासायनिक घटकांचे औषधी व इतर गुणधर्म आणि जनुकीय वैशिष्ट्यांचे गुपित, शिवाय या वनस्पतीच्या असण्याने - आधाराने वाढणारे जीव, त्यामागे घडणारे परस्परावलंबी रासायनिक आणि जेनेटिक नाट्य उलगडण्याकरता अजूनही विविधांगाने खूप अभ्यास होणे गरजेचे आहे.

या निसर्गचक्राशी आपल्या सगळ्यांचेच नाते असते कारण आपले आयुष्यही याचाच एक भाग आहे. परंतु सगळ्यांनाच शास्त्रीय संदर्भ माहीत असणे गरजेचे नसले तरीही हा निसर्ग ठेवा जतन होण्याच्या दृष्टीने यासारखी माहिती अनेकांपर्यंत पोहोचली तर आपल्या परिसरातील या दुर्मीळ ठेव्याचे रक्षण करण्याची इच्छा आणि जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाला वाटेल. म्हणूनच या वनस्पतीच्या पुनर्शोधाची ही माहिती!

(भवताल बेवसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४१ वी गोष्ट.)

 

- डॉ. संजय औटी, नाशिक

[email protected]

(सर्व फोटो - डॉ. संजय औटी)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

33 Comments

digambar gadgil

will it b possible and feasible to implant such endemic plants to grow elsewhere and save them from possible extinction? dr auti to speak

धनंजय मदन

महत्वपूर्ण संशोधन व माहितीपूर्ण लेख. या शोध निबंधाच्या आधी असलेल्या फोटो मधील फुलं सह्याद्री आढळणाऱ्या कोरांटी सारखी दिसत आहेत.

Bhavatal Reply

Thank you.

M N Damle

निसर्ग हा अनेक वैविध्यपूर्ण बाबींनी भरलेला आहे .पण अशा गोष्टींचा चिकाटीने शास्त्रीय अभ्यास करून जगासमोर त्याची माहिती सप्रमाण सादर करणे वेळकाढू व कष्टप्रद आहे .असे काम करणाऱ्या अभ्यासकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच .

Bhavatal Reply

खरंय. या अभ्यासकांचे अभिनंदन. प्रतिसादाबद्दल आपले आभार.

Swapnil Wagh

Very nice information about Dicliptera leonotis

Bhavatal Reply

Thank you.

पाचोरे मनोहर

शरद कांबळे व निलेश मालपुरे सरांचे मनापासून अभिनंदन. खरोखरच हे अतिशय कष्टाचे काम आहे घरदार सोडून दूर जंगलात जाऊन अशा दुर्मिळ वनस्पतीचा शोध घेणे हे खडतर काम आहे. दोघांना ही खूप खूप धन्यवाद

Bhavatal Reply

खरंय, हे चिकाटीने करण्याचे काम आहे. धन्यवाद.

Khose Ramchandra

Nice information Dr Sanjay Auti

Bhavatal Reply

Thank you.

Manish Arun Baviskar

डॉ. औटी सर व सर्व सन्माननीय सदस्यांचे अंजनेरी पर्वतावरील जैवविविधतेबाबत अतिशय अभ्यासपूर्वक व खूप महत्वपूर्ण काम आहे. आपल्या या कार्याचा उपयोग अंजनेरीची जैव-वैविधता अबाधित राखण्यासाठी होवो याच शुभेच्छा. धन्यवाद.

Bhavatal Reply

धन्यवाद.

Nitin Hiray

Great commitment... Will help in conservation of the area

Bhavatal Reply

Thank you.

Dr. Sudin Dalave

Thanks to Dr. Sanjay Auti, who explored Anjaneri hills a religious place with geographical and historical importance for the availability of plants and prepared first documentry on plant diversity of Anjaneri. I congratulate Dr. Auti for this milestone activity in the field of plant science, definately this work will help and motivate young researchers.

Bhavatal Reply

Very true. Thank you.

Nikita Balasaheb Rayate

Nice to see

Bhavatal Reply

Thank you.

Roshan pawar

Nice work

Bhavatal Reply

Thank you.

Gangurde kajal babaji

nice work

Bhavatal Reply

Thanks.

Jadhav Shivani Hemant

Nice work sir.Also very helpful and informative information.

Bhavatal Reply

Thank you.

Jadhav Shivani Hemant

Nice work sir.Also useful and informative information.

Bhavatal Reply

Thanks.

Sonawane swati balu

Thank you sir Very nice & useful information about Dicliptera Leonotis

Bhavatal Reply

Thank you for your response.

Parkhe Sadhana Shivaji

Very nice

Bhavatal Reply

Thanks.

Davkhar Krushna

Very good work sir

Bhavatal Reply

Thank you.

Pawar Mayur Ramdas

Excellent work sir..

Bhavatal Reply

Thank you.

Sakshi rajendra deore

Nice

Bhavatal Reply

Thank you.

Nikam Asmita

Nice work

Bhavatal Reply

Thanks.

Kapadne pranjal sanjeev

Very good

Bhavatal Reply

Thank you.

Dr. Swati Samvatsar Pandit

It is always a pleasure to rediscover a species for a taxonomist. Western ghats have such many more elements to be rediscover. Very good attempt

Bhavatal Reply

Very true. Thank you.

Nawale Nikita Bhausaheb

Very nice 👌

Bhavatal Reply

Thank you.

Pawar snehal

Very nice

Bhavatal Reply

Thank you.

Ashish Niphade

Nice article

Bhavatal Reply

Thank you.

Sathe mayuri gangadhar

Very good

Bhavatal Reply

Thanks.

Kangune bhagyashri Ramdas

This information is very nice and useful ..

Bhavatal Reply

Thank you.

Rutuja

Very nice sir & useful information about Dicliptera leonotis.

Bhavatal Reply

Thank you.

Khan Saranjum Akbar

Thanks you sir! Very useful and Innovative.

Bhavatal Reply

Thanks.

Bhavar Janhavi Dilip

Very nice information

Bhavatal Reply

Thank you.

Pranjal Binaykiya

Thank you so much sir for sharing this amazing feast of knowledge

Bhavatal Reply

Thank you.

Dr.Avinash Shivaji Jondhale

This is very good information about Dicliptera cilata and congratulations to respected Dr. Auti Sir

Bhavatal Reply

Thank you.

Wankhede Sumegha Ravindra

Thank you Sir Very useful information about dicliptera leonotis.

Bhavatal Reply

Thank you.

Your Comment

Required fields are marked *

You may also like