Articles 
यंदा ९९ टक्के पावसाचा अंदाज!

यंदा ९९ टक्के पावसाचा अंदाज!

महाराष्ट्रात चांगल्या पावसाची चिन्हे

.

देशातील मान्सून काळातील पावसाचा प्राथमिक अंदाज भारतीय हवामान विभागाने गुरुवारी (१४ एप्रिल २०२२) जाहीर केला. त्यानुसार देशात मान्सून काळातील (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या संदर्भात हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या पावसाच्या नकाशावरून महाराष्ट्रात चांगल्या पावसाची चिन्हे दिसत आहेत. सुधारित अंदाज मे महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाणार आहे.

या अंदाजाचे ठळक मुद्दे असे:

  • २०२२ च्या मान्सून काळात (जून ते सप्टेंबर) देशात ९९ टक्के पावसाची शक्यता (मॉडेलमधील मर्यादेनुसार या अंदाजात ५ टक्के तफावत -कमी किंवा जास्त- असू शकते.)
  • मान्सूनच्या पावसाला पूरक ठरणारा प्रशांत महासागरातील ‘ला-निना’ घटक संपूर्ण मान्सून काळात सक्रिय राहण्याची शक्यता.
  • मान्सूनच्या पावसावर प्रभाव टाकणारा हिंदी महासागरातील ‘इंडियन ओशन डायपोल’ (IOD) हा घटक सामान्य राहण्याची शक्यता.
  • या अंदाजानुसार तयार केलेल्या नकाशावरून महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता.
  • मान्सूनच्या पावसाचा अंदाज  दोन टप्प्यांमध्ये दिला जातो. यापुढील सुधारित अंदाज मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होईल.

 

नकाशाबाबत=

·नकाशात निळा ते गडद निळा रंगाने दर्शवलेल्या प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.

·हिरव्या रंगाने दर्शवलेल्या प्रदेशात सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

·पिवळ्या व लाल रंगांनी दरशवलेल्या प्रदेशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

(भवताल अपडेट्स; संदर्भ= भारतीय हवामानशास्त्र विभाग)

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like