माळराने विशेषांक

भवताल : दिवाळी अंक २०२३ 



अनुक्रमणिका


दिवाळी अंकाविषयी...

भवताल : दिवाळी अंक २०२३

गवताळ प्रदेशांचा जागतिक पसारा 
* आशिष नेर्लेकर

जगाच्या सर्वच भागात गवताळ प्रदेश पाहायला मिळतात. त्यांच्यात अनेक समान धागे आहे, त्याचबरोबर ते सर्वच प्रदेश आपापले वेगळेपणही राखून आहेत. त्यांची सविस्तर ओळख करून घेतल्यावर खऱ्या अर्थाने गवताळ प्रदेशांचा विस्तृत पट उलगडायला मदत होईल. त्यासाठीच या प्रदेशांच्या जागतिक पसाऱ्याचा आढावा...

'माणूस' घडवणारी माळराने
* सुभाष वाळिंबे

माणूस कसा उत्क्रांत (आणि त्यासोबतच प्रगत) होत गेला, याचा धांडोळा घेतल्यावर एक बाब ठळकपणे लक्षात येते. ती म्हणजे, त्याचे जंगलातून माळरानांवर येणे यामुळे हे शक्य होऊ शकले. शेतीला सुरुवात केली तीसुद्धा गवताच्या कुळातील प्रजातींसोबतच. हा सारा पट पाहिला तर गवताळ माळराने आणि माणसाचे 'माणूस' बनणे याचा अतिशय घट्ट संबंध असल्याचे दिसते. 

सोनेरी माळरानांचे मानकरी
* ओवी थोरात

माळरानांची परिसंस्था अनेक सजीवांच्या अस्तित्त्वाने बहरली आहे. त्यांचे एकमेकांशी असलेले नाते, संबंध आणि तेथील अन्नसाखळी या दृष्टीने सर्वच जीव महत्त्वाचे आहेत. पण क्षितिजावर सोनेरी झाक उमटणाऱ्या या माळरानांचे काही निश्चित मानकरी आहेत. त्यांचीच ही ओळख...

कधायू नदीकाठच्या गावांचा गोष्ट
* विकास कांबळे

गवताच्या रानावर पिके घेण्यासाठी अनेक गावे उत्सुक असतात, पण हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीकाठचे शेतकरी सोयाबीनसारखे नगदी पीक घेण्याऐवजी तिथे गवत पिकवतात. विशेष म्हणजे गवत त्यांच्यासाठी आर्थिक दृष्ट्या फायद्याचे ठरते... पण हे करणे आव्हानात्मक होते. ते कसे घडले? आणि त्यातून काय घडले? याचीच ही गोष्ट.

लांडगा, बिबट्या आणि माळराने...
* इरावती माजगावकर 

दक्खनच्या पठारावर शेकडो वर्षांपासून माळरानाच्या वातावरणाला साजेशी परिसंस्था निर्माण झाली आहे. त्यावरील विविध वन्यजीव, त्यांचे आंतरसंबंध आणि पारंपारिक व्यवसाय हे परस्परांशी तसेच, इथल्या वातावरणाशी जुळवून घेत आले आहेत. माळरानाशी जुळवून घेतलेला लांडगा, येथे नव्याने आलेला बिबट्या आणि स्थानिक समाज यांचा एकमेकांशी असलेला व बदललेला संबंध सांगणारी ही गोष्ट....

याशिवाय इतर अनेक विषयांचा समावेश असलेला हा दिवाळी अंक.