Rainfall Observation For Date 25-06-2023
Participants Name : Gulab Sahane
Title : कालचा पाऊस
Description : जुन महिना संपत आलाय.मृग नक्षत्र कोरड गेलं.आद्रा नक्षत्र सुरु आहे.आज सकाळ पासून असह्य उकाडा आहे.घामाच्या धारांनी शरीर थबथबलंंय .हळूहळू काळ्या-पांढऱ्या ढगांचे पुंजके जमा व्हायला लागलेत.गावाच्या दक्षिण-पूर्वेला असलेल्या आढूळा-भागडा डोंगराच्या बेचक्यात ढगांची गर्दी होतेय.अनेकदा पावसाला इथनुच सुरुवात होतेय.दुपारी तीनची वेळ.एकाकी जोराचा पाऊस सुरु झाला आहे.आणि बघता बघता त्यानंं रौद्ररूप धारण केलंय.क्षणात जिकडे तिकडे पाणीच पाणी झालंय. आढूळा-भागडा व गावाशेजारील गव्हाळा डोंगरावरून नयनरम्य डोंगरकडे वेगाने आढळा नदीकडे झेपावले.वातावरण बदलले.बेफाम पाऊस आणि अमाप उत्साहाने रानंं ओसंडून वाहत आहे.सृष्टी खरोखरच किमयागार आहे.गुलाब सहाणे,सावरगावपाट,अकोले,अहमदनगर दि.२४/०६/२०२३