पर्यावरणाच्या मुद्द्यांचा आपल्याशी असलेला संबंध उलगडून दाखवणे, त्याबाबत सजग करणे, कृतिशील उपाय सुचवणे यासाठी भवताल मॅगझिन. सोबतच महाराष्ट्रातील नैसर्गिक संसाधनांचे दस्तावेजीकरण करणे हाही एक उद्देश. त्यातील मजकूर महत्त्वाचा आहेच, पण वाचकांना आकर्षित करण्यासाठी त्याची आकर्षक आणि रंजक पद्धतीने मांडणी, म्हणजे भवताल मॅगझिन! Register
Ahuja tower, Yoginagar marg, eskar, Borivali west, Mumbai.
भवताल तर्फे गेल्या वर्षीप्रमाणे येत्या पावसाळ्यातही संपूर्ण महाराष्ट्रभर सामाजिकरित्या पाऊस मोजला जाणार आहे. हा उपक्रम जून ते ऑक्टोबर या काळात केला जाईल. या काळात दररोज 15 - 20 मिनिटे (शक्यतो सकाळच्या वेळेस) द्यायची तयारी असेल तर तुम्हीसुद्धा या उपक्रमात सहभागी होऊ शकता. 10 वर्षांपेक्षा पुढील कोणाही यात भाग घेऊ शकतो. लहान मुले पालकांच्या / शिक्षकांच्या मदतीने सहभागी होऊ शकतात.
घर, अंगण, बाग, शेत, सोसायटी, कॉलनी, शाळा, महाविद्यालये, संस्था, ऑफिस, शासकीय कार्यालये अशा कोणत्याही ठिकाणी पाऊस मोजला जाऊ शकतो. महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्यांना पाऊस मोजण्याची इच्छा असेल त्यांना नाव नोंदवावे.
प्रत्येकाने तयार करायाबाबत आणि ते वापरून पाऊस कसा मोजायचा याबाबत ‘भवताल’ तर्फे ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण - मार्गदर्शन पूर्णपणे विनामूल्य असेल. नावनोंदणी ३१ मे २०२५ पर्यंत सुरू राहील.
नाव नोंदणीसाठी पुढील लिंक क्लिक करून किंवा QR कोड स्कॅन करून माहिती भरा.
प्लास्टिकमुक्त पर्यावरणाच्या दिशेने ‘प्राज’चे पाऊल प्लास्टिक हा खरेतर उपयुक्त पदार्थ. त्याने माणसाचे संपूर्ण जीवन व्यापले आहे. मात्र, निसर्गत: विघटन न होण्याच्या त्याच्या गुणधर्मामुळे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने प्लास्टिकच्या कचऱ्याने आज पर�...
हवा,
पाणी,
पर्यावरणाचा
आरसा!
बदल घडवण्यासाठी
कोणीतरी "आरसा" दाखवावा लागतो,
ती जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे.
कृतिविना
शहाणपण
व्यर्थ आहे.
म्हणूनच,
हरित भविष्यासाठी छोटसं पाऊल !